बऱ्याच कंपन्या कर्मचाऱ्यांसाठीच्या आरोग्य विम्याचा हप्ता भरतात, परंतु तो कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पगारातूनच. अर्थात हा हप्ता कर्मचारीच स्वतः भरतात असे म्हणण्यास हरकत नाही. दुसरी गोष्ट, विमासुरक्षेनंतर देखील अनेकदा 'कोपे' (copay) नावाची एक गोष्ट असू शकते जी कर्मचाऱ्याला उपचार घेतेवेळी स्वतःच भरावी लागते. ती काही डॉलर्स ते काही शे डॉलर्स इतकी असू शकते. तिसरी गोष्ट, प्रत्येक विम्याच्या अटी वेगवेगळ्या असतात. जसे काही वेळा विमा कंपनी दंतचिकित्सेसाठी आणि दंतोपचारांसाठी विमासुरक्षा देत नाही, तेव्हा दात दुखू लागल्यास त्यावर स्वखर्चाने उपचार करावे लागतात.

तेव्हा कितीही प्रतिवाद केला तरी अमेरिकेत आरोग्य विम्याची सोय फुकट मिळत नाही ती नाहीच.