अनुभवकथन. आवडले. मॅरथॉन पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन!
मनाच्या शक्तीच्या जोरावर आपल्याला काय कुणालाही जगातली कुठलीही गोष्ट अशक्य नाही हे प्रकर्षाने जाणवत होतं
अगदी खरे बोललात.
आपले अनुभव वाचताना मला देखील पूर्वी केलेला एक सायकल ट्रेक आठवला. कोकणातल्या घाटांनी घाम काढला होता. त्यात आमचे वेळापत्रक असे होते की खेडजवळचा भोस्ते घाट चढायला आम्ही चांगल्या रामप्रहरी सुरुवात केली होती. मग घाट चढता चढता, एकेक जण थांबत आपल्या जवळचे साखरफुटाणे, चॉकलेट, गूळ, रेवड्या असे गोड आणि 'ऊर्जादायी' खाद्यपदार्थ काढू लागला आणि सायकलवरून न उतरता घाटमाथा गाठायच्या केलेल्या माझ्या प्रयत्नाने त्या 'वाटमाऱ्यां'समोर हात टेकले. तुमचा लेख वाचून 'नॉस्टॅल्जिक' झालो, धन्यवाद.