आली जरी रात्र अमावस्येची
पहाटेचा प्रहर मी
ओसाडलेल्या माळरानात
छोटासा बहर मी

हळूच काढतो चिमटे
नाही तसा छचोर मी
प्रतीसाद न देण्याइतपत
नाही इतका मुजोर मी

राजेंद्र देवी