फक्त 'अमेरिका' न म्हणता कोणी 'नॉर्थ अमेरिका' म्हणू लागले, की नक्की ओळखावे की सद्गृहस्थ (वा सद्गृहिणी) कॅनडाबद्दल बोलत आहेत.
जसे, कोणी 'इंडो-पाकिस्तानी' रेस्तराँ (मराठीत: 'रेस्टॉरंट'.) म्हटले, की सदर संस्थापनेचा चालक-मालक हा हटकून 'तोचि पाकी ओळखावा', तसेच आहे हे! (भारतीय असता, तर बहुतकरून 'इंडियन' रेस्तराँ म्हणाला असता.)
आपण 'बाँबे'चे, अशी ओळख सांगणारा हमखास डोंबिवलीकर निपजतो, तद्वत्.
ता. क. : आणि हो, 'क्यूबेक' नव्हे. 'क्विबेक', किंवा 'केबेक'. इथे पहा.