मित्रा प्रदीप!
छान आहे तुझी ही छोट्या बहरामधली गझल!
वृत्त तुला सुचले की, ठरवून या वृत्तात लिहिलेस?
एक उत्सुकता म्हणून विचारले!
खूप बरे वाटले. आनंद झाला.
तुझी ही गझल वाचता वाचता आमच्या मनात खालील शेर उफाळून आले.
पहा कसे वाटतात ते..................
तुलना वगैरे नाही रे बाबा!
काही कुठे चुकत असल्यास जरूर सांग, म्हणजे आम्हास काही शिकता येईल.
आम्हास स्फुरलेले तुझ्या गझलेवरील शेर खालीलप्रमाणे........
हे विश्व माझे घर!...असा मी!
संचारतो जगभर!...असा मी!!
ठेचाळतो हमखास जो तो.....
वाटेतला पत्थर असा मी!
मी तोलतो एकेक शब्दा.....
व्हावे न का कट्टर असा मी?
माझ्यावरी बरसे मरातब!
आहेच मात्तबर असा मी!!
हा शायराचा पिंड माझा;
असतोच खुश मजवर असा मी!
आता जरासा मोकळा मी.....
असणार ना नंतर असा मी!
नाहीस तू कळते तरीही.....
रेंगाळतो क्षणभर असा मी!
दृष्टीत मी, सृष्टीतही मी!
साक्षात परमेश्वर असा मी!!
ना रंग, नाही रूप काही;
गंधामुळे....सुंदर असा मी!
आहे असा.... आहे तसा मी....
म्हणतात तुम्ही, तर....तसा मी!
...........प्रा.सतीश देवपूरकर
.......................................................................................................