विजयराव,
तिसऱ्या शेरातील ‘तिला’ म्हणजे कुणाला? शेर संदिग्ध वाटला आम्हाला तरी!
बाकीचे शेर ठीकठाक!
आपली ही गझल वाचून आम्हास खालील शेर स्फुरले..........
यामुळेच मी कुणा न शिस्तबद्ध वाटतो!
नेमके नको तिथेच सत्य बाब बोलतो!!
कोण तेवतीच ठेवतो उरात ज्योत ही?
कोण आजकाल हा प्रकाश दिव्य धाडतो?
वावगे कधीच मी कुणास बोलणार ना;
त्यामुळे बऱ्याचदा असाच गप्प राहतो!
गाडणे स्मृतींस शक्य काय जाहले कुणा?
भूतकाळ वर्तमान होवुनीच भेटतो!
आजकालचा, कितीक, मित्र बोलका दिसे!
क्षेमकुशल नेहमी इमेलने विचारतो!!
.............प्रा.सतीश देवपूरकर