सर्वप्रथम,
ज्योतीताईंना त्यांच्या कार्याबद्दल सलाम!
खरं आहे,अशा मुलांच्या कल्याणासाठी काही करायचं असेल तर प्रथम आपल्या मुलाला "काही" झालेलं आहे हे आधी स्वीकारावं लागतं.
आणि हेच नेमकं "स्वीकार" करणं प्रथम फार कठीण जातं.
त्यात बराच वेळ जातो.
त्यामुळं लवकरात लवकर उपचार होण्यासाठी
प्रथम "स्वीकार" हा महत्वाचा आहे.
मानसिक धक्क्यातून सावरायला वेळही लागतो आणि धाडसही. "पर्याय नसतो" हे, सगळं सावरल्यावर लक्षात येतं.
मी स्वतः एका "सेरेब्रल पाल्सी" ने ग्रस्त मुलीचा पालक आहे. हाही एक मेंदूशी संबंधित रोग आहे. ह्याच्याही काही पातळ्या आहेत.
त्यावरून ठरतं की हा रोग कितपत बरा होऊ शकतो. पण कितीही बरा झाला तरी १०० टक्के बरा होऊ शकत नाही.
मेंदूतल्या काही पेशी पूर्णपणे मृत झालेल्या असल्यामुळे हा रोग पूर्ण बरा नाही होत.
माझ्या मुलीला आम्ही आता होमियोपथी उपचार देतो आहोत. त्याबरोबरच फिजिऑथेरपी आणि स्पीचथेरपीही चालू आहे, गेली चार वर्षे. ती सध्या पाच वर्षाची आहे....... असो.

ज्योतीताईंच्या कार्याला सलाम व शुभेच्छा....