कथा , अगदी कथा म्हणून स्वीकारणे जरा अवघड वाटते मला तरी !
एक म्हणजे परत येण्याचा निर्णय इतक्या स्वप्नाळूपणे घेता येत नाही, गिरीश ने तो भावनेच्या आहारी जाऊन घेतला असेल असे वाटत नाही.. त्याला नेम्के  काय " गुड" अपेक्शित होते ? भौतिक "गुड" ?
कारण याच ( आणि अशाच ) भारतात राहून तो लहानाचा मोठ्ठा झाला आहे .. भारतात येऊन त्याचा भ्रमनिरास वगैरे नाही होणार , कारण इथली परिस्थिती , निदान त्याला तरी नवीन नाही.. तेव्हा तो वैतागून तो परत गेला हे मान्य होऊ शकत नाही.
दुसरे असे की. एकदा परत आल्यावर  तो स्वाभाविक पणे ज्या साठी  परत आला ( आई- वडील / आपली माणसे / आपली माती )  , त्याबाबत त्याच्या काय भावना आहेत ? त्याची कदाचित तीव्रता कमी होईल पण अगदी परत जावे असे त्याला ७-८ महिन्यातच वाटेल का ?
अमेरिकेत सगळेच आल वेल आहे असे आहे का ? आजारीपणाचा खर्च कदाचित सरकार करत असेल पण तुम्ही आजारी आहात म्हणून भेटायला येणारे किती ? तोंडाला चव नसेल म्हणून लोणचे घेऊन कोणी येईल का ? आस्थेने डोक्टरशी कोण बोलेले ?
आणि अमेरिकेत गरिब - श्रीमंत भेद नाहीत च का ? ( मोलकरीण - पिझझा ) तिथेही " आहे रे " आणि " नाही रे " आहेतच की !
माणसाच्या संवेदना किती तीव्र ( unconditional ) आहेत त्यावर सारे अवलंबून आहे .. त्या बोथट झाल्या की आपण कारणे शोधायला लागतो.
मग एकदम भारतातील गरिबी आणि भ्रष्टाचार दिसायला लागतो .
आणि असे अनेक गिरिश परत गेले म्हणून भारताला वाईट दिवस येतील असे मला वाटत नाही.. पूर्वीच्या काळी देखील हे झालेच आहे.. जावा , सुमात्रा, बाली , कुंभोज .. इकडे लोकांनी स्थांनांतर केले आणि भारतीयत्व टिकवून ठेवले .. वाढवले..मूळ भारत अजूनही "सुवर्ण भूमी "आहेच ! आणि अर्थिक सुबत्ता हे  काही धन्यतेचे परिंमाणच नव्हे !  अनागोंदी आणि भ्रष्टाचार हे तरी कायमच राहतील का ?
एक उदाहरण देतो आणि थांबतो ..
माझी आई ही माझी आई असते .. ती दिसायला/ असायला कशीही असली तरी .. सुम्दर आहे म्हणून अभिषेक बच्चन ची आई माझी आई होऊ शकत नाही ....! 
(असो .. कुणालाही दुखवण्याचा हेतू नाही .. I respect every individual and his/her  opinion )