गाय मारकी असेल (किंवा तसा संशय जरी असेल) तर जरूर सावरकरवादी व्हावे. नसेल तर कोणते वादी किंवा प्रतिवादी व्हावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न! आम्ही तर मोठमोठ्या कारखान्यातल्या अजस्र यंत्रांवरही कुंकवाची चार बोटे आणि स्वस्तिक पाहीले आहे, संगणकाच्या सर्वरवरही बऱ्याच ठिकाणी अशी चिन्हे दिसतात. त्यामूळे दगडातही देव पाहण्याची सवय असलेल्या श्रद्धाळू हिंदूने गायीचीच काय कशाचीही पूजा करावी (अगदी दुकानातून आणलेल्या कोऱ्या मनिल्यालाही पुसटशे कुंकू लावून नंतर तो घालावा) आणि अश्रद्ध हिंदूने हीहीहीहीहीही केले (आणि उत्तरादाखल आम्ही विज्ञानवादी आहोत असे म्हटले) तरी त्याला काही वाईट बोलून प्रतिकार करू नये असे वाटते.