"शून्याने भागाकार हा वर्ज्य आहे," असे आम्ही शाळेत असताना आमच्या गणिताच्या मास्तरांनी वारंवार कंठशोष करून सांगितल्याचे आजही आठवते. अशा परिस्थितीत, कवीचे सर्व काही "शून्यात भागते" नेमके कसे, हे समजू शकले नाही.
की, शून्याने भागाकार केला असता एकाचे दोन करून दाखवता येतात*, या कारणास्तव घेतलेले पोएटिक लायसन आहे हे?
* सोप्पे आहे.
समजा, अ = ब.
म्हणजेच, अ२ = अब.
म्हणजेच, अ२ -ब२ = अब - ब२.
म्हणजेच, (अ + ब)(अ-ब) = ब(अ-ब).
दोन्ही बाजूंस (अ - ब)ने भागले असता, (हाच तो सुप्रसिद्ध शून्याने भागाकार! )
अ + ब = ब.
आता अ = ब हे मूळ गृहीतक लक्षात घेता
ब + ब = ब.
म्हणजेच, २ब = ब.
दोन्ही बाजूंस ब ने भागले असता, (अ ची, आणि म्हणूनच ब ची, किंमत शून्य नसल्यास, हा वैध भागाकार असू शकतो!)
२ = १.