टग्या, महेश,
तुमचे प्रतिसाद वाचून मजा वाटली.
शून्य अपेक्षा ठेवल्या  तर (अपेक्षा अगणित नसल्या तर - हा अजून एक शून्याने भागण्याच्या विरोधात जाणारा, व्यवहारात बसणारा पण गणितात न बसणारा अर्थ! ) उगाच हिशोब मांडत बसायला लागत नाही  या अर्थानं हा शेर मी लिहिला होता.
गणितातच लिहायचं तर - माझं एकट्याचं शून्यात भागतं म्हणजे मला वाटतं १/० असं न करता ०/१=० असं करायला हवं. त्यामुळे शून्याला भागण्याचा प्रश्न आहे, शून्याने नाही.
महेश, 'निःशेष' हा शब्दप्रयोग आणि तुमचा पहिला बदल आवडले; पण शून्याने भागच जात नाही तर शेष/निःशेष राहण्याचा प्रश्नच येत नाही. दुसऱ्या शेरातलाही 'अर्थ' या शब्दातला श्लेष आवडला.
- कुमार
ता. क.
वरदा - चिडू हा शब्द मात्रांत बसवायला जरा अवघड वाटला आणि 'मुझपे क्यू बिगडते हो' या अर्थानं 'बिघडू कशाला' असं सुचलं.