तुझी गझल वाचताना आम्हास जाणवलेल्या बाबी खालीलप्रमाणे:
शेर नंबर१.....मागचे विसरून माझ्याबरोबर माझे-तुझे नवे गाणे आता पुन्हा म्हणू ये<<<<<<इथे दोन्ही मिसरे अजून नात्याने घट्ट हवे होते असे वाटले.
शेर नंबर२..........शेर जरा सपाट वाटला.
शेर नंबर३..........शेर विधानात्मक वाटला.
शेर नंबर४.........छान!
शेर नंबर५..........पानही मधील ही....खटकले. थवे उतरणेऎवजी दुसरे काही तरी हवे होते असे वाटले. पक्षांचे/पाखरांचे थवे असे असते तर शेर अधिक बोलका झाला असता.
शेर६........जन्मतानाचेच होवू नागवे......शब्दरचना खटकली. खयाल चांगला आहे.
वर दिलेल्या शेरनिहाय बाबी ध्यानात घेवून मला खालील खयाल सुचले............
सूर प्रीतीचे ऋतूही आळवे आता पुन्हा!
गुणगुणू माझे-तुझे गाणे नवे आता पुन्हा!!
भूतकाळाला जरी कुलुपात केले बंद मी;
कालचे काहीतरी मज आठवे आता पुन्हा!
माणसांच्या मागण्यांना अंत कुठलाही नसे.........
एक झाले देवुनी, दुसरे हवे आता पुन्हा!
रात्र उठते खायला दररोज नेमाने मला......
तू दिलेले दु:ख मजला जोजवे आता पुन्हा!
आज एकाकी फिरोनी जाहलो निष्पर्ण मी!
पाखरांचे दूर गेले ते थवे आता पुन्हा!!
एकही चिंधी न उरली कनवटीला शेवटी......
नागव्याने जन्मलो अन् नागवे आता पुन्हा!
..........प्रा.सतीश देवपूरकर
टीप: रदीफातील आता पुन्हा या शब्दांमधे दोन्ही शब्द काळवाचक असल्याने कानाला थोडेसे खटकले.
........................................................................