भोमेकाका आणि प्रवासीमहाशय,

'प्लेजर प्रिंसिपल' साठी संदर्भ देण्याचे राहून गेले. कदाचित संदर्भ वाक्य हे असे असू शकते.

पाश्चिमात्य संस्कृती ही 'प्लेजर प्रिंसिपल' वर आधारित आहे.

प्लेजर या शब्दाचा सकारात्मक अर्थ (प्रवासींनी म्हटल्याप्रमाणे) आनंद किंवा खुशी असा होऊ शकतो. पण मग मी दिलेल्या वाक्यात हा अर्थ वापरला तर पाश्चिमात्य संस्कृती ही 'आनंदाच्या तत्त्वा'वर आधारित आहे असे शब्दशः भाषांतर होईल.  

आनंद किंवा खुशी असा अर्थ वापरून हे वाक्य जमून आल्यासारखे वाटत नाही.