कुमारजी आपली गझल वाचताना आम्हास खालील गोष्टी जाणवल्या..........
१) मतल्यातला अलामतभंग खटकला. सोडू, निवडू असे चालत नाही गझलेत. –हस्व अलामतीत चालू शकते. मतला संदिग्ध वाटला.
२) आपली गझल वाचल्यावर आम्हास खालील शेर स्फुरले.....,,
मतला नाइलाजाने असा करावा लागत आहे, कारण मूळ आपल्या मतल्यात काय म्हणायचे आहे ते उमगत नाही, म्हणून त्यातल्या त्यात असा मतला लिहावा लागला.
पहा कसे वाटतात हे शेर...............
ह्या क्षणांची साथ मी दवडू कशाला?
धावते जे दूर ते पकडू कशाला?
मान्य की, करशील तू माझी दुरुस्ती;
फक्त यासाठीच मी बिघडू कशाला?
घोंगडे माझे भिजत ठेवू किती मी?
एक साधा प्रश्न अन् रखडू कशाला?
फूल म्हटले की, अरे आलेच काटे......
ही फुले...काटे असे निवडू कशाला?
काय कोणाला बदलणे शक्य आहे?
वाफ तोंडाची तरी दवडू कशाला?
वावडे त्यांना प्रकाशाचे असावे;
काळजाचे दार मी उघडू कशाला?
शेवटी येणार आहे शून्य उत्तर!
सोडवायाला गणित झगडू कशाला?
............प्रा.सतीश देवपूरकर
................................................................