प्रोफेसरजी,
धन्यवाद. आपण सुचवलेली गझल एक स्वतंत्र गझल म्हणून चांगली आहे.
काही गोष्टी मात्र मला पटल्या नाहीत. उदा.
(१) अलामतच्या नियमावरचा उपाय (मतल्यात अलामत नसली तर पुढे असण्याची गरज नाही) हा सुरेश भटांनीच एल्गारमध्ये सांगितला आहे आणि उर्दूतही प्रचलित आहे. ऱ्हस्व अलामतीतच ते चालतं असं भटांनी म्हटल्याचं मला स्मरत नाही. त्यामुळे आणि त्याविनाही मला स्वतःला त्यात गैर वाटत नाही.
(२) पहिल्या मतल्यात संदिग्धता नाही असं आपण म्हटलं आहे; पण जे क्षण आता माझ्या सोबत आहेत त्यांचा मी आनंद घ्यावा आणि जे माझे नाहीत (किंवा ज्यांवर माझं नियंत्रण नाही) त्यांतून काही आपल्यासाठी निवडता यावं याची वाट का बघावी असा अर्थ मला अभिप्रेत होता.

- कुमार