कुमारजी!
आपले खयाल पोचले!
एल्गार मधील गझलेच्या बाराखडीत पान क्रमांक १००ते १०३या पानांवर अलामतीचे नि:संदिग्ध विवेचन दादांनी (आमचे गुरू कविवर्य सुरेश भट यांनी) केले आहे!
पान क्रमांक १०१वर ३ऱ्या परिच्छेदात शेवटची दोन वाक्ये अशी आहेत.........
"क्वचित ‘अ’च्या जागी –हस्व ‘इ’ किंवा ‘उ’ हा स्वर वापरला जातो." "परंतु तो अपवाद समजावा."
टीप: दादांबरोबर किमान १५ते२० वर्षे साहित्यिक सहवासाचे दुर्मिळ भाग्य परमेश्वरकृपेने आम्हास लाभले होते हे विनम्रपणे आम्ही कबूल करतो! आमच्या (फक्त मी व दादा) बऱ्याच रात्री झालेल्या गझलांवरील चर्चेत अलामतीचा मुद्दा हा नेहमी ठळकपणे असायचा. असो.
शेवटी हे फक्त संकेत आहेत तंत्रशुद्ध मराठी गझलेतले. पाळायचे की, नाहीत ते व्यक्तीसापेक्ष आहे.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद! असाच लोभ असू द्या.
.........प्रा.सतीश देवपूरकर