कुमारजी!
आमच्या गुरूंचे एक वाक्य आम्ही कायम लक्षात ठेवले आहे ते म्हणजे गझलेत शक्यतोवर कुठलीही सूट घेवू नये. गझल हा काव्यप्रकारच सर्वंगसुंदर असा आहे. कुठलीही सूट ही गझलेच्या जाणकारांना लगेच बोचते. गीतात असल्या सूट चालतात, पण गझलेत नाही.
खरी मजा तंत्रशुद्ध, प्रासादिक, गोटीबंद, लालित्यपूर्ण, बोलकी व आशयघन व व्यामिश्र(complex) म्हणजे अर्थाच्या दृष्टीने बहुअर्थी अशी गझल लिहिण्यात आहे!
याकरता हवे अनुभूतीचा प्रामाणिकपणा, लेखनगर्भ निष्ठा, शब्दांचे सखोल चिंतन व थांबायची तयारी!
कुठल्याही शेराकरता हटून बसू नये.
फुरसतीने, एकेक शब्दाची चव घेत घेत लिहावे.
टीप: आमच्या कित्येक गझला १०/१५ वर्षांनी हातावेगळ्या झाल्या आहेत!
प्रा.सतीश देवपूरकर