(१) समाजसुधारणा व समाजसंघटन या दोन्ही गोष्टी एकाच वेळी जमणे शक्य नाही हे सावरकरांना समजले नाही. लोकांना तुमचे चुकते आहे, त्यात सुधारणा करा म्हटले की लोक तुमच्या मागे येतच नाहीत.
विनायक तुम्ही म्हणालात ते !!! ( u said it ! )
पण त्यातही सावरकरांनी आम्ही भुकेने मरायला लागलो तर गायही खाऊ, पण आम्ही देव मानतो म्हणून मुद्दाम कत्तल कराल तर ते सहन करणार नाही असेही म्हटले होते.
(२) गाईला देव मानावे की नाही हा काही जीवनमरणाचा प्रश्न नाही. देव मानणारे भाकड गाईलाही सांभाळत रहातात, त्यात आर्थिक नुकसान होते हा मुद्दा लक्षात घेऊन दीनदयाल शोध संस्थान ( नानाजी देशमुख ), आणि भारतीय गोविज्ञान संस्था या खूप संशोधन करत आहेत आणि भाकड गाईपासूनही आवश्यक तेवढे उत्पन्न मिळवून दाखवण्यात त्यांना बऱ्यापैकी यश आले आहे.
(३) हिंदू समाज संघटीत करणे ही सर्वोच्च प्राधान्याची गोष्ट मानून हिंदू समाजाशी निगडीत विषय हे या धेयाशी सुसंगत अशा पध्दतीने हातात घेतले पाहिजेत असे मला वाटते.