माझ्यामते कविवर्य सुरेश भटांनी याबाबत (अलामत)दोन ठिकाणी उल्लेख केले आहेत.
एक उल्लेख बाराखडीमध्ये असा की जिथे'अ'ही अलामत असते तिथे क्वचितप्रसंगी ऱ्हस्व उ किंवा इ चालू शकतेप ण तो अपवाद समजावा.
अजून एका ठिकाणी ( बहुधा झंझावातमध्ये)त्यांनी 'दंश' या स्वतःच्याच रचनेचे उदाहरण दिले आहे की
मतल्यामध्येच हसणारच व डसणारच आल्यावर पुढील द्विपदींमध्ये दिसणारच व पिसणारच असे चालत नाही.
या रचनेचे उदाहरण त्यांनी स्वतःची चूक दाखवण्यासाठी दिलेले आहे आहे व तसा स्पष्ट उल्लेख केलेला आहे
त्याच ठिकाणी त्यांनी कुठल्याश्या उर्दू कवी सोबत झालेल्या चर्चेचे उदाहरण देऊन सांगितले आहे की मतल्यातच एकाओळीत 'अ' व दुसऱ्याओळीत'इ' अथवा 'उ' अशी अलामत घेतली की नुसत्या 'अ' अलामतीमधून मुक्त होता येते.
या दृष्टीने पहायचे झाल्यास वरील रचनेतील मतला सदोष आहे. परंतु मतल्यातील तेवढा दोष दुरुस्त करता आल्यास ही खूप सुंदर गझल आहे. .... मला ही गझल खूप आवडली. "मौन जर साधून देते" आणि "दार स्वप्नांचे" हे दोन शेर सुंदरच आले आहेत