होय, या गझलेत मतल्यातच इ आणि अ आल्याने पुढे भरायासाठी, पुरायासाठी, शिरायासाठी हे काफिये आहेत. तुमच्या वरील गझलेत. सोडू आणि निवडू असे अल्याने अलामत 'अ' आणि 'ओ' अशी झाली आहे. तसे नियमात बसत नाही. ( उदाहरण म्हणून एका फार सुंदर गझलेची आठवण करून दिलीत... धन्यवाद )
माझे उर्दूचे ज्ञान फारच तोडके आहे त्यामुळे उर्दू गझलांबाबत मी अधिकारवाणीने बोलू शकत नाही. परंतु जालावरच कुठेसे वाचल्याचे स्मरते की मराठीत तोडू कशाला मधील 'ओ' ही अलामत तो या अक्षराचाच भाग आहे. उर्दूमध्ये बहुधा आ/ओ/ई याचे वेगळे चिन्ह असते. आपण उर्दूमध्ये जे काही वाचतो ते देवनागरी लिपीत त्यामुळे हा स्वरचिन्ह प्रकार नीटसा ध्यानात येत नाही. ( उर्दूचे ज्ञान खूपच तोकडे असल्याने जास्त बोलू शकत नाही, इथे उर्दूचे कोणी जाणकार असतील तर कृपया खुलासा करावा )
दोन लघुंचा एक गुरू - जर असा दोन लघुंचा एक गुरू करून तो शब्द चपखल बसत असेल आणि त्यामुळे काव्याची गोडी वाढत असेल तर मला वैयक्तिकरित्या यात काहीही वावगे वाटत नाही.
अवांतर - मला नुसतेच अज्ञात/ एक अज्ञात संबोधलेत तर आनंद होईल त्यापुढे कोणतीही ( राव, पंत,) उपाधी नको ही विनंती.