अज्ञात,
धन्यवाद. मराठी गझलेत मराठी स्वरांत भेदभाव का करावा हा माझा प्रश्न आहे. मराठीत 'ओ' हा स्वर जसा 'तो' चा भाग आहे, तसाच 'अ', 'उ', 'इ', 'ऐ' इ. आहेत. म्हणूनच मला असं म्हणायचं आहे की जर स्वरचिन्हे मतल्यातल्या दोन मिसऱ्यांत वेगळी आली तर ते ग्राह्य धरलं जातं (गालिबपासून भटांपर्यंत आणि दाग पासून मजरुहपर्यंत - ही मी वर्गवारी करत नाहीये; फक्त एका उदाहरणापासून दुसऱ्यापर्यंत असं म्हणतोय, हा नम्र खुलासा) तर मग हा नियम ऱ्हस्व स्वरांसाठी का?
- कुमार
ता. क. किंबहुना उर्दूतसुद्धा मी मगाशी दिलेल्या उदाहरणाप्रमाणे दीर्ध अक्षरे अलामत-भंग करताना दिसत आहेत (ती एकतर 'पडून' ऱ्हस्व होतात किंवा दीर्घ असूनही चालतात असं दिसतंय. थोडक्यात फक्त मराठी स्वरांतला (नसलेला) भेदभाव किंवा उर्दू गझलांशी पडताळणी हे दोन्ही निकष वापरले तरी मला हे दीर्ध स्वरचिन्ह वावगं का असा प्रश्न पडतो आहे. जाणकार कृपया खुलासा करतील का?