पुन्हा एकदा सांगू शकतो की उर्दूचे ज्ञान खूपच बेताचे असल्याने त्यावर भाष्य करू शकत नाही. पण उर्दूमध्ये उच्चारानुसार मात्रा मोजतात. तसे आपण मराठीत करू शकत नाही.
जर ऱ्हस्व 'उ' अथवा ऱ्हस्व 'इ' आणि 'अ' ही अलामत मतल्यातील दोन ओळींमध्ये चालते तर 'अ' आणि 'ओ' का नाही चालू शकत हे लॉजिक मलातरी फारसे पटलेले नाही. असो.

राग नसावा पण एक विचारतो - तज्ज्ञांकडून सर्व नियम काटेकोरपणे पाहून समजा असे ठरले की अशी अलामत चालत नाही, तरिही आपली वरील रचना सुंदर आहेच ( प्रतिसाद देणाऱ्या बहुतेक सर्वांनी तसे नमूदही केले आहे)आणि हे सांगण्यासाठी कोणत्याही तज्ज्ञाची आवश्यकता नाही असे असताना "वरील रचनेला गझल म्हणा" हा आग्रह का? एखादी रचना गझल नसेल तर ते काव्य कमजोर ठरते का?