कुमारजी!
अलामतीबाबत थोडासा खुलासा करतो.........
प्रथम एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की, उर्दू ही phoneticभाषा आहे, जिच्यात शब्दांच्या उच्चारांप्रमाणे त्यांचे वजन ठरविले जाते. मराठी भाषा ही अशी उच्चारअनुगामी नाही! शिवाय दोन्ही भाषांची लिपीही वेगळी आहे.
काफियातील न बदलणाऱ्या एका अक्षराआधी किंवा एकाहून अधिक अक्षरांआधी येणाऱ्या एका विशिष्ट अक्षरातील स्वर हा कायम ठेवतात. हा स्वर जर ऱ्हस्व असेल म्हणजे अ/इ/उ तर, मतल्यातील दोन्ही मिसऱ्यात वेगवेगळे ऱ्हस्व स्वर असलेले काफिया चालू शकतात. हा एक अपवाद आहे जो मराठी गझलेत चालू शकतो असा एक संकेत आहे असे म्हणतात.
हा काफियातील स्वरभंगाचा कायदा मतल्यातच मोडला तर चालतो. मग मतल्यातील कोणत्याही काफियातील स्वर पुढील शेरांत चालू शकतो!
एका आमच्याच गझलेचे उदाहरण देतो........
काळजास झाल्या जखमा, जखमांची झाली लेणी!
जी दिलीस दु:खे मजला त्यांचीच जाहली गाणी!!
<<<<<<<<हा आमचा खूप जुना मतला आहे, जो तांत्रिकदृष्टीने सदोष आहे. कारण इथे जरी अलामतीचा कायदा मतल्यातच मोडला असला तरी, काफियातील न बदलणारे स्वर 'ए' व 'आ' असे दीर्घ(२मात्रा) वजनाचे आहेत, जे मराठी गझलेत संकेत म्हणून चालत नाही.
-हस्व व दीर्घ स्वर अलामतीचे काफिया गुणगुणून पहा, आपणास उत्तर आपोआप मिळेल.
हा मतला भटांना जेव्हा ऎकवला तेव्हा याच अलामतीबद्दल आमच्यांत चर्चा झाली, तेव्हा वरील गोष्टींचा उल्लेख भटांनी केला होता. असो.
हा दोष टाळण्यासाठी आम्ही वरील मतला परवा म्हणजे जवळपास १५ वर्षांनी बदलला तो असा..............
ही तुझ्या कृपेची किमया...लाभली मुक्याला वाणी!
जी दिलीस द:खे मजला त्यांचीच जाहली गाणी!!
.........प्रा.सतीश देवपूरकर
टीप: यामुळेच आमचे असे वैयक्तिक मत झाले आहे की, उर्दूच्या तुलनेत मराठीत गझल लिहिणे निश्चितच अवघड काम आहे!