प्रोफेसरसाहेब आणि अज्ञात,
रूढ संकेत म्हणून तुमचं म्हणणं मी मान्य करतो.  अर्थात फक्त वजन बदलतं म्हणून स्वरचिन्हांत उर्दूतून मराठीत जाताना भेद करावा/संकेत बदलावा  हे मला स्वतःला पटत नाहीये. प्रत्येक भाषेत तिचे नियम ठेवूनच संकेत यावेत आणि त्यामुळे गोडी येऊ/राहू शकते असं मला वाटतं.
हे माझं स्वतःचं मत... आपली मतं वेगळी आहेत हे स्पष्ट आहे आणि मी त्यांचा आदर करतो.
ह्या कवितेला गझल म्हणावं हा दुराग्रह मी ठेवणार नाही.
पुनः एकदा धन्यवाद!
- कुमार