अमेरिकेचा इतिहास शाळेमध्ये त्रोटक स्वरूपात अभ्यासाला होता. पुढे अमेरिकेशी संबंध येऊ लागल्यावर सध्याची अमेरिका (संयुक्त संस्थाने) कशी उदयाला आली आणि घडत गेली या बद्दल कुतूहल निर्माण झाले पण हा इतिहास मराठीत, थोडक्या शब्दात, मुद्देसूद असा वाचायला उपलब्ध नव्हता. ही उणीव '' वसाहत ते महाबलाढ्य राष्ट्र '' ही लेखमाला भरून काढील असा विश्वास वाटतो.