प्रत्येकच शेर ग्रेट. कोणकोणता उद्धृत करू ?
तरीही खास आवडलेले :
त्या प्रश्नाने मान वळवली थोड्या नाजुक अपघाताने
उत्तर किंचितसे अडखळले संधी साधत जाता जाता
दिशाहीन हसणारा वेडा कधी एकटा रडायचाही
कुणा न कळले आयुष्याशी होता बोलत जाता जाता
सुटेल सोबत जमिनीची पण ना भीती कुठल्याच पुराची
निघेन घेवुन डोळ्यांवर स्वप्नांचे गलबत जाता जाता