कृतान्त म्हणजे यम (ह्याची व्युत्पत्ती काय?)
असे मला वाटते.
कृतान्तकटकामलध्वजजरा दिसो लागली ।
असे केकावलीत मोरोपंत म्हणतात. येथे कृतान्त = यम, कटक = रथ, अमल = पांढरा, ध्वज = झेंडा, जरा = म्हातारपण. म्हणजे यमाच्या रथाचा पांढरा झेंडा, असे म्हातारपण (पांढरे झालेले केस = म्हातारपण)
ओळीचा अर्थ : म्हातारपणाची चाहूल लागली.
चू भू द्या घ्या