जयन्ता!
छान आहे तुझी गझल! आवडली.
फक्त अभिव्यक्ती थोडी अजून प्रभावी हवी होती.
आम्ही तुझी गझल अशी वाचून पाहिली......
काळजाची काच चकनाचूर झाली!
काळजी सगळीच माझी दूर झाली!!
त्या नकारांनी मला सज्ञान केले.....
माणसांची माहिती भरपूर झाली!
वादळे गेली कुठे कळले न कोणा;
माझिया हृदयातले काहूर झाली!
पापण्यांच्या दावणी तोडून सारी;
आसवांची ही गुरे चौखूर झाली!
भोगली शिक्षा... न केलेल्या गुन्ह्याची!
ऎकतो...'सुटका' म्हणे मंजूर झाली!!
...............प्रा.सतीश देवपूरकर