>भगवान श्री. रमण महर्षींची प्रदीर्घ काळ भक्तीभावाने देखभाल करणार्या श्री. माधव स्वामींना एका वर्षापूर्वीच १२ जुलै १९४६ रोजी देवाज्ञा झालेली होती. माधव स्वामीच या सफेद मोराच्या रूपात पुनर्जन्म घेउन परतले आहेत अशी कित्येक भक्तांची धारणा होती.
आपण आकार आहोत हा भ्रम म्हणजेच अहंकार आणि त्यापासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग म्हणजे अध्यात्म. आत्मा (किंवा आपण) स्थिती आहोत, आपण जन्म घेत नाही त्यामुळे पुनर्जन्माचा प्रश्नच नाही.
रमणांची 'हू अॅम आय' ही साधना त्या भ्रामातून मुक्ती देऊ शकते काय? तो भ्रम होण्याचं मूळ कारण 'मन' काय चीज आहे यावर लेखक भाष्य करू शकेल काय? त्यानं स्वतः ती साधना केली आहे का? त्या मार्गात काय अडचणी आहेत वगैरेचा परामर्ष इथे घ्यावा म्हणजे त्या साधनेचं आणि एकूणात अध्यात्मिक आकलन कितपत आहे ते प्रकट होईल.
मूळात आपण आकार आहोत हा प्रार्थमिक भ्रम असताना, माधव स्वामी 'मोर' झालेत या अत्यंत भ्रामक समजूतीवर हा लेख बेतला आहे आणि त्याला मूढ भक्ताच्या निराधार अज्ञानाचा भक्कम आधार आहे त्यामुळे अध्यात्मिक ज्ञानाचा सुंदर पिसारा कसा फुलतो याचं सुरेख उदाहरण म्हणजे हा लेख
(व्यक्तिगत रोख, संदर्भ व / वा विषयांतर वाटलेला मजकूर वगळला. : प्रशासक)