या वर्षीच्या (२०१२) "कालनिर्णय" दिवाळी अंकात डॉ. अरविंद संगमनेरकर यांची "ती परत दिसलीच नाही" ही तिसऱ्या पारितोषिकाची कथा प्रसिद्ध झाली आहे. तिची मध्यवर्ती कल्पना या सत्यकथेसारखीच आहे. फक्त तपशीलात फरक आहे. त्यामुळे अशा प्रकारची घटना खरोखरच घडली असली पाहिजे असं वाटतं. कृपया ज्यांना शक्य असेल त्यांनी कालनिर्णय मधली कथा वाचावी नि आपली मतं द्यावीत. घटनेचा निश्चित तपशील संबंधित शासकीय यंत्रणेनी शोधायला हवा. भारतीय वकिलातीनी याबाबत स्पष्टीकरण द्यायला हवं.