कुरणामधे गवत खाते, डबक्यातले पाणी पिते, लोकांना दूध देते, अशी गाय प्रियमाता आहे.
- वरदा
चरोनी कुरणामध्ये, पिते पाणी तळ्यातले।
दूध देई मनुष्यांना, गाय हो माय आपुली
आपला
(गोपुत्र) प्रवासी
धर्म ह्या शब्दाचा वापर संप्रदाय (रिलिजन) ह्या संकुचित अर्थाने होऊ नये असे वाटते. हिंदू हा संप्रदाय (रिलिजन) आहे की नाही हाही एक चिंतनाचा विषय आहे.
आपला
(शब्दविशिष्ट) प्रवासी
तृणं खादति केदारे जलं पिबति पल्वले
दुग्धं यच्छति लोकेभ्यो धेनुर्नो जननिप्रिया ॥
कुरणामधे गवत खाते, डबक्यातले पाणी पिते, लोकांना दूध देते, अशी गाय प्रियमाता आहे.
- वरदा
चरोनी कुरणामध्ये, पिते पाणी तळ्यातले।
दूध देई मनुष्यांना, गाय हो माय आपुली
आपला
(गोपुत्र) प्रवासी
शहाणे लोक सांगून गेले आहेत - मातृ देवो भव।
तेंव्हा गायीला देव मानून तिची पूजा करायची आम्हाला लाज वाटत नाही.
आपला
(निर्लज्ज) प्रवासी
इतर पशूंपेक्षा गायीचे स्थान वेगळे आहे. एक उदाहरण म्हणजे पंचगव्य. पंचगव्याची खत आणि जंतुनाशक म्हणून फार मोठी शक्ती आहे हे आता आधुनिक शास्त्रज्ञांनीदेखील पुनर्संशोधित केले आहे. इथे पाहा. हे केवळ एक उदाहरण झाले.
दूध देत नाही म्हणून गाय भाकड झाली, तिचा उपयोग संपला असे म्हणता येईल काय? जोपर्यंत गाय शेण, मूत्र देत आहे तोपर्यंत तिला निवृत्त करून चालणार नाही असे वाटते.
पर्यावरणाचा तोल राखण्यासाठी गायींचे जिवंत राहणे अत्यंत आवश्यक आहे असे वाटते. वैज्ञानिक आणि पर्यावरणी ह्या विषयावर किती काम करत आहेत ते इथे दिसेल.
आपला
(पर्यावरणी) प्रवासी