संदिप....

इथे तसा मी नवीनच सदस्य असल्याने सावकाशपणे सारे लेख वाचत असतो. आज सकाळी-सकाळीच तुमचा स्फूर्तीदायक असा हा शिकागो मॅरेथॉन लेख वाचला आणि दिवसाची सुरुवात अगदी आनंदाने झाली अशी मनी भावना निर्माण झाली आहे.

मी स्वतः कोल्हापुरातील स्थानिक मॅरेथॉन शर्यतीत भाग घेत असे [आता वयाची साठी आली असल्याने क्लबच्या मेडिकल टीमनेच स्पर्धेत भाग घेण्यास विनंतीपूर्वक मनाई केला आहे]. कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिर ते भोगावती सह‌. साखर कारखाना असे एकूण ३० किलोमीटर {दोन्हीकडून} अंतर असायचे. मी कधीही विजेता ठरलो नाही, पण शर्यत पूर्ण करणे हेही विजेतेपदापेक्षाही मोलाचे वाटत असे आमच्या ग्रुपला.

शिकागो मॅरेथॉन वर्णन वाचत असताना मला सातत्याने जाणवत राहिले की जणू काही मीदेखील तुमच्यासह अगदी जोडीने त्या शर्यतीत आहे.

त्या रस्त्यावर टांगलेल्या पोस्टरवरील .... "ऍड आय विश दॅट, आय विश टु रन लाइक यू". ..... हे वाक्य मी कधीतरी पोस्टरवर लावून इथल्या मॅरेथॉन शर्यतीच्या वेळी बसेन.... इतके ते स्फूर्तीदायक आहे.