भारतीय उपखंडात शेती बैलाच्या आधारेच केली जाते. ह्या मुख्य कारणासाठी गायी बैल न मारणे हा अर्थशास्त्रीय तोडगा प्राचीन भारतीय समाजधुरिणांनी काढलेला आहे असे कुठेसे वाचलेले आठवते.

गायी बैल मारणे जर निषिद्ध मानले नसते, तर ते मारून खाण्यामुळे त्याची मागणी आणि किंमत वाढत गेली असती, आणि शेतकऱ्याला ते परवडेनासे झाले असते. परिणामी शेतकऱ्याची आणि अर्थातच सर्व समाजाची परिस्थिती कठिण झाली असती. गायी बैल न मारण्यामुळे ह्या सर्वाचे सोपे उत्तर मिळाले.

गाय बैल खाटकाला देऊन मिळणाऱ्या किमती पेक्षा त्यांचा उपयोग शेतीला करून त्यातून मिळणारे उत्पन्न जास्त आहे हे कालौघात मनोमन पटल्याशिवाय समाजाने गाय बैल न मारणे हे स्वीकारले नसते असे मला वाटते.