महेशजी!
दोआपण म्हणता ते खरे आहे.
हे दोन वृत्तांचे मिश्रण आहे.
पण गुणगुणताना आपोआप जशी लय पहिल्या ओळीत गवसली तीच आम्ही इतर ओळीत पाळीत गेलो!
गझल लिहिताना तसे कोणतेही वृत्त मनात नव्हते!
मतल्यातला उला मिसरा जसा येवू पहात होता तसे त्याला आम्ही येवू दिले इतकेच!
गझलमधे आपण कोणतेही वृत्त वापरू शकतो!
standard वृत्तच पाहिजे असे नाही, आपण स्वत:चेही एक वृत्त तयार करू शकतो.
फक्त अट एकच की, एकदा एका मिसऱ्यात एक वृत्त ठरले की ते शेवटपर्यंत सांभाळायला हवे हे मात्र निश्चित!
आम्ही गझलेत योगायोगाने जे वृत्तमिश्रण योजले, त्यास नाव काय हे आम्हासही माहीत नाही.
जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा!
..............प्रा.सतीश देवपूरकर
टीप: शेरांबद्दल काही बोलला नाहीत महेशराव?