चर्चा खूप रंगली आणि उदबोधकही वाटली. प्रशासकांनी कित्येक सूचना स्वीकारल्या हे छान वाटलं. 'मनोगत' अधिक लोकप्रिय व्हावं असं अनेकांप्रमाणे मलाही वाटतं पण त्यासाठी फक्त प्रशासकांनीच नव्हे तर आपणही प्रयत्न करायला हवेत. उदा. एखाद्या आवडलेल्या मजकूराची 'लिंक' आपल्या परीचितांना विपत्राने कळवली तर त्यापैकी काही जण तरी 'मनोगत'चे सदस्यत्व घेतील.
'मनोगत' वरचा बहुतेक सर्व मजकूर वाचनीय असतो, काही लेख तर संग्राह्य असतात.
२०१२ चा दिवाळी विशेषांक हे एक उत्तम उदाहरण. अवधूत परळकर आणि डॉ. अनुपमा भावे यांच्या मुलाखती, 'शब्दानंद' हा लेख मला विशेष आवडले.
मनोगत वर वापरली जाणारी उच्चाराधारीत मराठी टंकलेखन सुविधा [मला वाटतं की 'ड्रूपल' प्रणीत] सोपी आणि सुटसुटीत आहे. मात्र ती 'ऑफ-लाईन' स्वरूपात [सशुल्क का होईना] उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा अशी माझी नम्र विनंति.
-बापूकरंदीकर