- छान.
हे जग कसल्या सुंदरतेने बरबटलेले आहे
- चित्त, ही ओळही आवडली. सुंदरतेने बरबटणे ही कल्पना वेगळीच आहे. दिवाळी अंकातील तुझ्या 'इलाखा शक्यतेने किर्र' असणे ह्या शब्दप्रयोगाची आठवण आली.
नव्यानवेल्या विवाहितेचे कुंकू पुसल्यावाणी
- 'नव्यानवेल्या'चे अमराठीपण खटकले. ही ओळ
हळद उतरण्याआधी कोणी कुंकू पुसल्यावाणी
अशी केली तर?
"काय तुझ्याही दारी आला तो फिरता विक्रेता" आणि "काय तुझे तारू तितकेसे भरकटलेले आहे" ह्या वाक्यांची रचनाही हिंदी धाटणीची वाटते. क्या वह तुम्हारे दर पर भी आया था, क्या तुम्हारा जहाज भी... मराठीत अशा स्वरूपाची वाक्ये "काय"ने सहसा सुरू केली जात नाहीत.