इथे कुणीही कुरूप नाही वेडेविद्रे नाही
हे जग कसल्या सुंदरतेने बरबटलेले आहे

नवीन दुनिया सापडेल पण सवाल इतका आहे
काय तुझे तारू तितकेसे भरकटलेले आहे

हे दोन खयाल फार सहज आणि सुंदरपणे आले आहेत. खूप आवडले.

शेवटच्या शेरात मागमूस न उरणे आणि एखाद्या जनावराने फरफटणे याची सांगड घातल्यावर हा शेर पुन्हा पुन्हा वाचला... भन्नाट.