प्रवासीमहोदयांशी सहमत!

या लोकांच्या डोळ्यात भाकड असण्याबद्दल गायच का खुपते? कुत्री-मांजरे, .......इतर प्राणी जे  सर्वसामान्यतः मासांहारात वापरले जात नाहीत त्यांच्या बाबतीत असाच विचार कधिही ऐकू येत नाही. पूर्वीपासून आपल्याकडे पंचगव्याचा पारंपारिक वापर होत आहे त्याला, तत्कालिन आधुनिकतेचा बुरखा पांघरून येणाऱ्या परंतु "वास्तविक भाकड" विचारांना अनुसरून नाकरणे हे हळदीच्या पेटंट्सारख्या प्रकरणांना पर्यायाने आपल्याच   मागसलेपणाच्या  प्रदर्शनास पूरक आहे.

याशिवाय,

"गाय हा अनेक प्रकारे उपयोगी पडणारा प्राणी आहे ह्यात शंका नाही पण शेवटी तो एक पशू आहे. त्याला देवत्व देणे किती योग्य आहे?"

या विधानावर असे उत्तर द्यावेसे वाटते की, तुम्ही खरोखर  "मनुष्य" म्हणून जगत असाल- जगायची इच्छा ठेवत असाल तर आपल्याला कुठल्याही प्रकारे उपयोगी पडणाऱ्या सर्व प्राण्यांविषयीच उदात्त दृष्टिकोन ठेवायला लाज वाटू नये (शेवटी हे आपल्याच पर्यावरणाचे घटक आहेत. आपल्यावर केल्या जाणाऱ्या उपकारांची प्राण्यांएवढीही जाण आपल्याला नसेल तर आपल्या विकासाचा काय उपयोग? (इथे "सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट" वगैरे विधाने करणाऱ्यांना काय सांगावे !? )

सावरकरांनी देशहिताच्या दृष्टिने केलेल्या इतर क्रांतिकारी कामाबद्दल मला आदर आहेच. आणि हे विधान अंधश्रद्धेच्या व बुरसटलेल्या कल्पनांच्या आहारी गेलेल्यांना विचारप्रवृत्त करणारे जरूर असेल हे मान्य करावे लागेल परंतु केवळ म्हणून रुढी-परंपरेत सांगितले आहे त्याच्या विरूद्ध बोलूनच आपण क्रांतिकारी विचारांचे ठरू का?

ठळक दाखल्यांसहित सोदाहरण व सडेतोड प्रतिसादाबद्दल प्रवासीसाहेबांचे अभिनंदन!