धन्यवाद.
- 'नव्यानवेल्या'चे अमराठीपण खटकले. माझ्या 'मनात मेंदी सुकण्याआधी' वगैरेही आले होते. पण ते मला पटले नाही. जास्त स्पष्टता येते आहे आणि विचार करण्यासाठी जागा सुटत नाही आहे असे वाटले. 'नव्यानवेल्या' माझ्या कानांनाही थोडे बरे वाटले.
"काय तुझ्याही दारी आला तो फिरता विक्रेता" आणि "काय तुझे तारू तितकेसे भरकटलेले आहे" ह्या वाक्यांची रचनाही हिंदी धाटणीची वाटते. क्या वह तुम्हारे दर पर भी आया था, क्या तुम्हारा जहाज भी... मराठीत अशा स्वरूपाची वाक्ये "काय"ने सहसा सुरू केली जात नाहीत.
मिलिंद, सुरुवातीबाबत काय म्हणायचे ते नीटसे कळले नाही. 'तो फिरता विक्रेता तुझ्याही दारी आला होता काय?' असे वाक्य असल्यास ते मराठी वाटेल काय? मराठीतही 'दारी येतात' असे वाटते. त्यामुळे 'दारी येणे' खटकले नसावे ही अपेक्षा. :) 'देवाचिये दारी उभा क्षण भरी', 'वासुदेव आला दारी' वगैरे. 'भरकटलेले तारू' तसे मराठीत वापरतात. बाय द वे, हिंदीत बहुधा 'जहाजा'ऐवजी 'कश्ती ' म्हणतील.