प्रिय प्रशासक,
माझ्या एका जाणकार मित्राने सांगितले की वरील हझल काहीशी सदोष आहे. तिच्यात मी काही बदल करत आहे. कृपया हझलेत आणि शीर्षकात खालीलप्रमाणे बदल करावेत ही विनंती. बदल केल्यावर हा प्रतिसाद काढून टाकण्यास हरकत नाही. तसदी दिल्याबद्दल क्षमस्व.
बहर गझलेचा उचलला, अन् हझल झाली!
अर्थ शेरांचा बिघडला, अन् हझल झाली!!
केवढ्या सहजीच आली चाल हाताशी;
काफिया नुसता मिळवला, अन् हझल झाली!
चिंतनाची बात नाही, मौत प्रतिभेची!
कळफलक नुसता बडवला, अन् हझल झाली!!
दाद देण्या येत नाही कोणिही दर्दी!
मीच मग डंका पिटवला, अन् हझल झाली!!
ते गझलसम्राट अन् मी एक हा कवडा!
प्रत्येक शेरा फाडला, अन् हझल झाली!!
खर्चिली मी खेचण्यासाठीच ही शाई
कंडरोगा त्या शमवला, अन् हझल झाली!
अडकली कोठेच नाही आमुची गाडी.......
काव्यरस फुकटी मिळवला, अन् हझल झाली!
काय 'चैत्या' ही तुझी का रीत लिहिण्याची?
चोर तू ऐसा जाहला, अन् हझल झाली!