ही बातमी वाचून मन सुन्न झालं. तिची तब्बेत बरी नसल्याचे काही महिन्यांपूर्वी कळले होते. दिवाळी अंकाच्या संदर्भात माझे तिच्याशी फोनवर बोलणेही झाले होते. एखादा लेख आणि शब्दकोडे देईन असे ती म्हणाली होती. आणि त्याप्रमाणे तिने दिलेही. आता तिची तब्बेत चांगली झाली आहे असाच माझा समज झाला.
तिला संस्कृतमध्येही चांगली गती होती. मला एकदा रघुवंशातील एक श्लोक हवा होता पण तो अर्धवट आठवत होता. तो कुणाकडे पूर्ण मिळेल असा विचार करायला लागल्यावर डोळ्यांसमोर पहिले नाव अदितीचे आले. आणि तिनेही मला काही मिनिटातच तो श्लोक पाठवून दिला!
मला स्वतःला आणि मनोगतींनाही  तिची उणीव भासत राहीलच.
तिच्या मातापित्यांना ह्या दुःखाला सामोरे जाण्याची शक्ती मिळो.