अदिती....

अविश्वसनीय म्हणावा असा योगायोग. 'लखलख चंदेरी' हा लेख इथे प्रकटला ५.११.२०१२ रोजी आणि ठीक एक महिन्याने म्हणजे ५.१२.२०१२ रोजी या दुनियेतून तिने निघून जाण्याची बातमी येते.

याच लेखात अदितीने म्हटले होते.... "पण गेल्या काही वर्षांत घरातली वृद्ध माणसं दृष्ट लागल्यासारखी एकापाठोपाठ एक् देवाघरी गेली आणि माझा या सगळ्यातून जीवच उडाल्यासारखा झाला." .... अन आज खरेच वाटेना झाले आहे की तिचाच जीव आता इथून उडून गेलाय.

मन बधीर होणे म्हणजे काय याचा अनुभव म्हणजे ही बातमी.