प्रत्येक भूतात (प्राण्यात) देव आहे म्हणून तर वैश्वदेव करतात. ते सर्व प्राण्यांच्या हितासाठी केलेले कर्म असते.
उपयुक्त आहे म्हणून देव मानावे असे आमचे म्हणणे नाही. पर्यावरणाशी अधिकाधिक सामंजस्याने जे राहते त्यास मानाचे स्थान द्यावे एवढेच आमचे म्हणणे आहे.
आपल्याला देव ह्या संकल्पनेवर चर्चा करायची असेल तो वेगळा मुद्दा आहे. परंतु गायीची पर्यावरणीय क्षमता लक्षात घेतल्यास तिला समाजात मानाचे स्थान मिळणे साहजिक आहे असे वाटते.
बैल हा जन्माने गोपुत्र असतो. आम्ही धर्माने गोपुत्र आहोत. इथे धर्म म्हणजे संप्रदाय नाही. धर्म ह्याचा एक अर्थ कर्तव्य असा आहे. आम्ही कर्तव्याने गोपुत्र आहोत असे म्हणायला हरकत नाही असे वाटते.
आपला
(कर्तव्यनिष्ठ) प्रवासी