फाशी ही गुन्ह्यासाठी असते. तो कुणाच्या राजवटीत झाला याचा काय संबंध? भाजप सत्तेत असताना संसदेवर हल्ला करणाऱ्या गुन्हेगाराला काँग्रेसने फाशी देऊ नये असा कायदा आहे काय? भाजपची सत्ता जाऊन अनेक वर्षे लोटली तरीही काँग्रेस अफजल गुरूला फाशी देत नाही हे काँग्रेसचेच अपयश आहे, केवळ अपयश नव्हे तर धर्माचे राजकारण आहे. कसाबला फाशी द्यायला चार वर्षे लागलीच ना? मग संसदेवर हल्ला झाला त्यानंतर भाजप किती वर्षे सत्तेवर टिकला तेही पाहा.

अफजल गुरूला इथल्याच अनेकांचा पाठिंबा होता, काश्मिरात त्याची पाळेमुळे आहेत, कसाबचे तसे नव्हते. अफजलला फाशी दिली तर मकबूल बटच्या फाशी प्रमाणे काश्मिरात कारवाया वाढतील व सरकारची लोकप्रियता तिथे खलास होईल व जनमत विरुद्ध होईल म्हणुन हे बोटचेपे धोरण आहे. कसाबला फाशी देण्यामागचे एक कारण समोर आलेली गुजरात निवडणूक व त्यात दिसत असलेला मोदी साहेबांचा स्पष्ट विजय. काहीतरी केले असे दाखवावे म्हणून कसाबला फाशी दिले गेले, कारण त्याच्या मागे उघडपणे कुठलीही अतिरेकी संघटना उभी राहीलेली नाही .