अफजल गुरू सध्या तुरुंगात आहे. त्यामुळे तो सध्या देशद्रोही कारवाया करु शकत असेल असे वाटत नाही. त्याला लगोलग फाशी देऊन फुटीरतावाद्यांच्या हाती आयते कोलीत देऊन देशद्रोही कारवाया वाढवण्यापेक्षा त्या खटल्यासंदर्भात असणाऱ्या सर्व औपचारिकता पूर्ण करुन (माफीनामा वगैरे रीतसर फेटाळून) मग त्याला फाशी दिल्याने फार मोठे आभाळ कोसळेल असे वाटत नाही. कसाबच्या फाशीचा मामला जसा साधासरळ होता, तसा अफजल गुरूचा मामला नसावा असे पेपरातल्या बातम्या वाचून वाटते.
माझ्या मताप्रमाणे वरील लेखात कोण गुन्हेगार व कोणाला फाशी ह्या मुद्द्याऐवजी भाजपा कसा दुटप्पी पक्ष आहे हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. अफजल गुरुच्या गुन्ह्याच्या शिक्षेबाबत एवढा पुळका येणाऱ्या भारतीय जनता पक्षाने त्यांच्या सत्ताकाळात गुन्ह्याची तपासणी आणि शिक्षेची अंमलबजावणी यांबाबत चालढकल करण्याचे काही कारण नव्हते.