नमस्कार,
मला सावरकरांचेच विचार पटतात. गाय हा एक उपयुक्त पशू आहे. सावरकरांना नावे ठेवणं फार सोप्प आहे, आणि आपल्यातले काही विद्वान आणि विचारी मनोगती आजही ती ठेवत आहेत. असो.
विवाह, केशवपन, स्त्रियांचे शिक्षण वगैरे प्रश्न त्यावेळी महत्वाचे होते आणि त्यावर सावरकरांनी त्यांचे महत्व जाणून लेखन व कृती (सहभोजन, पतितपावन मंदिर वगैरे) केले हे निःसंशय चांगलेच झाले.
हो का? नक्की चांगलेच झाले का? नशीब त्या सावरकरांचे!
तिसरा महत्वाचा भाग अर्थशास्त्रीय आहे, जो सावरकरांच्या खिजगणतीत नाही.
बरं, नसूदे. बिचारे सावरकर, बरं झालं. गेले बिचारे!! ज्यांच्या घरच्या स्त्रियांनी स्मशानातले पिंड खाल्ले त्या मंडळींना अर्थशास्त्र काय समजणार?
समाजसुधारणा व समाजसंघटन या दोन्ही गोष्टी एकाच वेळी जमणे शक्य नाही हे सावरकरांना समजले नाही
आधी किमान एक दिवस तरी कोलू पिसुन दाखवा आणि मग सावरकरांना काय समजलं आणि काय समजलं नाही याची भरल्या पोटी निवांत चर्चा करा. असो. इतर मनोगतींची असेल, पण निदान सावरकरांची "समज" या विषयावर काही बोलण्याची माझी तरी प्रज्ञा नाही.
(सावरकरभक्त) तात्या