महेश,
ही माहिती पुरवल्याबद्दल धन्यवाद. पण ऍक्सलरेशनसाठी, "त्वरण" हा जास्त योग्य प्रतिशब्द वाटतो ना? म्हणूनच कदाचित बदलला असावा.
आमच्यावेळी (तुम्ही उल्लेखलेल्या सालानंतर बरोबर २० वर्षांनी;)) पुढील पारिभाषिक शब्द होते,
डिस्प्लेसमेन्ट=विस्थापन व्हेलॉसिटी=वेग ऍक्सलरेशन=त्वरण स्केलर=अदिश व्हेक्टर=सदिश संवेग=मोमेन्टम् इ. इ. आजही ते शब्द आठवले की मस्त वाटतं
आणखी एक प्रश्न विचारावासा वाटतो, भौतिकशास्त्रात एक प्रयोग केला जायचा ज्यामध्ये एक दगड किंवा ठोकळा दोरी बांधून एका "तोटी असलेल्या चंचुपात्रात" सोडला जाई. त्या "तोटी असलेल्या चंचुपात्रा"ला काय शब्द होता आठवते का? (उत्तर "बहुतेक" मला माहित आहे;))
~शशांक