सत्य हे कल्पितापेक्षा अद्भुत असते ते असे. या सूत्राला अनेक वळणे देता येतील. धाकट्या बहिणीला मारकुट्या नवऱ्यापासून सोडवण्यासाठी मोठी बहीण काही करते का? त्यात ती यशस्वी होते का, की तीच अडकते? सध्या कलर्स या वाहिनीवर सुरू असलेल्या एका चित्रमालिकेमध्ये आपल्या मुलीवरचा जरठ-कुमारी विवाहाचा बाका प्रसंग टाळण्यासाठी खुद्द आईच मुलीच्याऐवजी लग्न करते आणि सासरच्यांना वठणीवर आणू पाहते असे कथानक आहे. तसेच काहीसे इथेही घडू शकते. शक्यता अजमावणे हे मोठे आनंददायी असते.