भगवान श्रीकृष्णाचे गीतेच्या पाचव्या अध्यायात खालील वचन आहे,

विद्याविनये संपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि।
शुनि चैव श्वपाके च पण्डिता समदर्शना॥

मला कळलेला अर्थ असाः जाणकार मनुष्य गाय, हत्ती, विद्वान, कुत्रा आणि चांडाळ सगळ्यांना समदृष्टीने पाहतो.
साक्षात गीतेतच असे वचन असल्याने गाय काय आणि काही काय मनुष्याच्या श्रद्धेवर आणि विश्वासावर हा देव मानन्या न मानण्याचा भाग सोडावा असे वाटते. कोणताही मांसाहार हा सर्वच प्रकारच्या वैद्यकशास्त्रात निषिद्ध मानला गेला असल्यामूळे गायी आणि इतर प्राणी खाऊन उदरनिर्वाह करण्यापेक्षा इतर शाकाहारी पदार्थ अवलंबावे असे वाटते.