कोण होते हे बारा भाई?

बारभाईंचा बारा  ह्या आकड्याशी तसा काही संबंध नाही. रघुनाथरावाने पेशवेपद मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना प्रतिशह देण्यासाठी सखाराम बापू, भगवंत बोकील, नाना फडणीस, त्रिंबकराव पेठे, हरिपंत फडके, मालोजी घोरपडे, महादजी शिंदे, तुकोजी होळकर वगैरे जी मुत्सद्दी आणि सेनानी मंडळी एकत्र आली त्यांना बारभाई म्हणतात.